Ad will apear here
Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी बनविली स्मार्ट बस सिस्टीम प्रणाली
आधुनिक स्मार्ट बस सिस्टीम  प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स विभागामधील प्रणव कवठेकर, तन्मय जोशी, पूजा पाटील व रोहिणी चव्हाण या विद्यार्थ्यांनी परदेशात कार्यरत असणाऱ्या आधुनिक बसचा संदर्भ घेऊन ‘डीकेटीई’मध्ये स्मार्ट बस सिस्टीम हा प्रकल्प बनवला आहे. 

‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यानी नेहमी समाजोपयोगी संशोधन प्रकल्प उभे केले आहेत. हा प्रकल्पही त्यापैकीच एक असून, या प्रकल्पामुळे बसचे कोलमडलेले वेळापत्रक, बसमध्ये होणारी गर्दी, चालत्या बसमध्ये तिकीट काढताना येणाऱ्या अडचणी, अचानक बस रद्द होणे, दिवसेंदिवस वाढते अपघाताचे प्रमाण या शिवाय अपघात झाला, तर त्या ठिकाणी तत्पर मदत कार्य कसे करता येईल या बाबींचा विचार करून प्रवाशांचा बस प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे. या विद्यार्थ्यांना प्रा. व्ही. बी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पामुळे बससंदर्भातील अनेक त्रुटी कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पामध्ये बसचे लाइव्ह लोकेशन दर्शवणारे, तसेच पुढील बस स्थानकाबाबत पूर्वसूचना देणाऱ्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. बसमधील एकूण प्रवाशांची संख्या, एकूण बसथांबे, लागणारा वेळ या सर्व गोष्टींची माहिती प्रवाशांना मोबाइल अ‍ॅपद्वारे मिळण्यास मदत होईल. तिकीट काढण्यासाठी होणारा त्रास पाहता प्रत्येक प्रवाशांना ‘आरएफआइडी’ पासची सुविधा पुरविण्यात आली आहे. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील चाप बसणार आहे. या सर्व सोईमुळे बसचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे. 

हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या विविध स्पर्धांमध्ये सादर केला असून, या प्रकल्पाला अनेक ठिकाणी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, उपसंचालिका व विभागप्रमुख प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व विभागातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZKGBZ
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
‘डीकेटीई’मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’मध्ये दिल्लीतील भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा मतदार यादीत समावेश व्हावा व त्यांचा मतदार प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रश्‍ननियमावली, पोस्टर प्रेझटेंशन आयोजित
‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार इचलकरंजी : विद्यार्थी कल्याणासाठी व उद्योजकतेला देण्याच्या हेतूने डीकेटीईचा व्हिएतनाम देशातील हॅपेसेन या कंपनीशी सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांना या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईमध्ये सुरू असलेल्या फॉरेन कोट्याअंतर्गत शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या ड्रिफ्टर्स संघाने ‘राष्ट्रीय अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप २०१८’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. विविध राज्यांतील सुमारे ७०हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language